• prakashbodhle@gmail.com

अखिल भारतीय वारकरी मंडळा विषयी महिती

'धर्माचे पाळन I करणे पाखांड खंडण' II

- जगद्गुरू संत तुकाराम महाराज.

akhilbhartiyavarkarimandal.org
akhilbhartiyavarkarimandal.org
akhilbhartiyavarkarimandal.org

परिचय पत्र ‌‌


ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज डिकसळ. ता.कळंब.


 • १) संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ डिकसळ, ता.कळंब, जि.उस्मानाबाद र.नं.ई(२३१) (३).
 • २) अध्यक्षः श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिकसळ, ता.कळंब, जि.उस्मानाबाद र.नं.अे.२८१६ शासनमान्य पर्यटनस्थळ.
 • ३) अध्यक्षः विठ्ठल रुखमीणी मंदिर डिकसळ, ता.कळंब, जि.उस्मानाबाद र.नं.अे ७९६ शासनमान्य तिर्थक्षेत्र. ब दरजा प्राप्त धाकटी पंढरी स्वयंभु श्री विठ्ठल रुखमीणी मंदिर.
 • ४) अध्यक्षः श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराज बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ डिकसळ ता.कळंब, जि.उस्मानाबाद र.नं
 • ५) महाराष्ट्र शासनाचे तीर्थक्षेत्र पैठण येथील संतपीठावर नऊ वर्ष पीठाचार्य म्हणून कार्यरत.
 • ६) संतपीठाचे अभ्यासक्रम मंडळावर दोनवेळा अध्यक्ष म्हणुन कार्य
 • ७) महाराष्ट्रशासनाचे श्री संत ज्ञानदेव तुकाराम पुरस्कार समितीवर सलग नऊ वर्ष काम पाहिले.
 • ८) महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक राज्य पुरस्कार मुख्यमंत्री माननीय सुशील कुमार शिंदे साहेब यांचे शुभहस्ते व इतर मंत्रीगण
 • ९) अनेक सेवाभावी संस्थाचेकडून वेगवेगळे अनेक पुरस्कार प्राप्त.
 • १०) अखिल भारतीय वारकरी मंडळ व महाराष्ट्र शासनाचे संयुक्त विद्यमाने कीर्तनकारांच्या कार्यशाळा व मेळावे घेऊन कीर्तनाद्वारा शाळेच्या शिक्षणाबद्दल विद्यार्थी व पालकांचे मध्ये प्रबोंधन करून शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबवणे व शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याविषयी महाराष्ट्राचे सर्व जिल्ह्यात कार्यशाळा व मेळावे घेण्यारी कर्म केले.
 • ११) २५ वर्षापुर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधि सोहळ्याचे निमित्ताने महाराष्ट्रात सात जिल्ह्याचे ठिकाणी सात विराट ज्ञानेश्वरी पारायण सोहळे घेऊन त्यामध्ये कीर्तन प्रवचनाचेद्वारा अध्यात्मा बरोबरच महिला सक्षमीकरण बेटीबचाव जलसंधारण, पर्यावरणसंकल, वृक्षारोपन इत्यादि विषयीचे लाखो लोकांचे कडुन संकल्प करुन त्यांना वरील विषयी प्रेरित करुन कार्यरत करणे. इत्यादि कार्य केले.
 • १२) जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांचं जन्मचतुः शताब्दिचे निमित्ताने २००८ साली २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर आंतरराष्ट्रीय गाथा पारायण सोहळा. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे माध्यमातुन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने हरिगुरु व संत कृपेने महाराष्ट्राचे सर्व जिल्ह्यातुन व भारतातील १७ प्रांतातुन आणि भारताबाहेरील अनेक देशातुन भाविकांची मादियाळी तीन लक्ष लोकांचे उपस्थिती दोन लक्ष भावीकांनी श्री संत तुकाराम महाराजांचे गाथाचे पारायण केले कीर्तन, प्रवचन, भजन, संगीत भजन, जानता राजा असे अनेक विविध कार्यक्रमाने देहु नगरी वेकुंठ नगरी बनली होती व त्यामध्ये अनेक मंत्री नेते मान्यवरांची उपस्थिती लागत होती त्यामध्ये वृक्षारोपन, बेटीबचाव, कृपोषण मुक्ति यासारखे अनेक सामाजिक संकल्प करुन तीन लक्ष लोकांना व्यसनमुक्तिसह कीर्तनातुन प्रबोधन केले. यासर्व कायाक्रमाचे सर्वसर्वा ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज होते.
 • १३) २००९ साली श्री गुरु रामचंद्र बोधले महाराजांचे रोप्य महोत्सवी बर्षांचे निमित्ताने श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिकसळ, ता.कळंब, जि.उस्मानाबाद र. नं. अे. २८१६ या संस्थानचे अध्यक्ष यानात्याने २५ ठिाकणी काही तालुके व कांही मोठ्या गावात एकुन २५ भव्यनाम सप्ताह केले. ज्यामध्ये भाविकांची उपस्थिती लाखोचे संख्येने होती. त्यामध्ये अध्यात्मा बरोबरच, स्त्री शिक्षण, बेटी बचाव, व्यसनमुक्ती वृक्षारोपन, अंधश्रद्धा निर्मुलन इत्यादि सारख्या अनेक सामाजीक विषयावर प्रबोधन आणि उपस्थित सर्व भावीकांचे कडुन वरील कार्यास प्रवृत्त करुन त्यांना सुयोग्य नागरिक बनवण्याचे कार्य.
 • १४) आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन वर्षाताई गायकवाड यांनी निमंत्रणावरुन मंत्रालयात बैठक घेऊन व अखिल. भारतीय वारकरी मंडळाचे संयुक्त विद्यमाने देवगड येथे कृपोषण मुक्तिची कार्यशाळा यासाठी १० हजार कीर्तनकारांची उपस्थितित कार्यशाळा घेऊन कीर्तनातुन कुपोषण मुक्तिचे प्रबोधनात्मकार्य राज्यभर केले .
 • १५) बीड येथे कलेक्टर कवडे साहेब व आयुक्त भोगे साहेबांचे सुचनेवरुन महाराष्ट्रशासन व अखिल भारतीय वारकरी मंडळाचे संयुक्त विद्यमाने १५००० कीर्तनकारांची कार्यशाळा घेऊन त्या विषयीचे महाराष्ट्राचे गावांगावात प्रबोधन केले.
 • १६) कार्यस्थळ आलंदी (देवाची ) ता. खेड येथे पाणीपुरवठा मंत्री लक्षुमनराव ढोबळे यांचे माध्यमातुन अखिल भारतीय वारकरी मंडळ व महाराष्ट्र शासनाचे संयुक्त विद्यमाने राज्यभरातुन ७००० हजार कीर्तनकारांची कार्यशाळा घेऊन विविध सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नावर प्रबोधनात्मक कार्य केले.
 • १७) प्रधान सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांचे सुचनेवर महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय वारकरी मंडळाचे संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियानाच्या राज्यातील प्रत्येक महसुल विभागात कीर्तनकारांच्या कार्यशाळा घेऊन वरील विषयी कीर्तनातुन प्रबोधन केले.
 • १८) ग्रामविकास मंत्री जयंत पाटील साहेब व समन्वय मल्लिनाथ कलशेट्टी साहेब यांचे विनंतीवरुन अखिल भारतीय वारकरी मंडळ व महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने श्रीनाथ पैठण येथे संतपीठ पैठणच्या इमारतीत व आवारात २५००० कीर्तनकाराची कार्यशाळा घेऊन, वृक्षारोपन व पर्यावरन संतुलन विषयीचे प्रबोधन कसे करावे या विषयी कार्यशाळा घेऊन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील साहेब, २) वनमंत्री बबनराव पाचपुते ब औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या सन्माननीय उपस्थित कार्यशाळामध्ये राज्यातील कीर्तनकारांनी आपल्या कीर्तन आमदार, खासदार, आणि प्रशासनातील वरील विषयाचे प्रबोधन कारांचा संकल्प केला. व तसे राज्यभर कार्य केले.
 • १९) ओरंगाबाद येथील वाल्मी याठिकाणी अर्थ व बनमंत्री सुधीर मुनगुंटीवार साहेब, बबनराव लोणीकर साहेब, पाणीपुरवठा मंत्री व ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे आणि मराठवाड्यातील सर्व कलेक्टर, सी.ई.ओ. व आमदार यांचे उपस्थितीत कार्यक्रमात ह.भ.प. प्रकाश बोधले महाराजांचे वृक्षारोपन विषयीचे प्रभावशाली व्याख्यान आणि राज्यभर वरील कार्य कीर्तनकाराचे माध्यमातून प्रबोधन करण्याचे नियोजना नंतर अखिल भारतीय वारकरी मंडळीचे महाराष्ट्भर कार्य केले.
 • २०) मुंबई येथे आमदार, विनायक राव मेटे व आमदार भाई जगताप कामगार नेते यांचे माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रमामध्ये ह.भ.प.प्रकाश बोधले महाराजांची प्रबोधनात्मक कार्यक्रम.
 • २१) श्री.बाबुराव रामेष्टी साहेब कामगार नेते यांचे माध्यमातुन मुंबई येथे कामगारांचे मध्ये अनेक विषयावर प्रबोधनात्मक कार्य.
 • २२) अखिल भारतीय वारकरी मंडळ व आळंदी व आळंदीकरांचे संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे २०१५ डिसेंबर २५ ते २०१६ ३ जानेवारी या कालावधी विराट असा आंतरराष्ट्रीय पारायण सोहळा ऐक लक्ष भावीक पारायण सोहळ्यात सहभागी व दोन लक्ष भावीक उपस्थित. यासाठी देशभरातुन भावीकांची उपस्थिति असुन विदेशातुन भावीकांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये दिल्ली येथुन कांही मंगीगण आले होते. त्यावेळी त्यांनी दिल्ली येथे अशा प्रकारचा कार्यक्रम रामलिला मैदानावर व्हावा अशी अपेक्षा केली होती. त्याप्रमाणे पुढे दिल्लीलाही कार्यक्रमाचे योग झाले. या कार्यक्रमासाठी देशभरातुन महान महान विभूंतीचे आगमन झाले. दिल्ली हुन राष्ट्रसंत श्री आदरणीय सुधांयु महाराज जी आले तर उत्तर हिंदुस्थानातुन वैष्ण आखाडा, शेव आखाडा आणि शंकराचार्य इत्यादि व महाराष्ट्रातील सर्व मान्यवर संत महंत आले. या भव्य सोहळ्यात ही व्यसनमुक्ती, स्वच्छता, अभियान बेटीबचाव महिला सक्ष्मीकरण व इत्यादि अनेक सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नाबाबत प्रबोधन होऊन अशा कार्यक्रमांचे संकल्प उपस्थितांचे कडुन करून घेतले याचे कार्यक्रमाचे सर्वेसर्वा प्रकाश बोधले महाराज होते.
 • २३) दिल्ली येथे २०१८ साली ११ मार्च ते १८ मार्च रामलिला मैदानावर आंतरराष्ट्रीय ज्ञानेश्वर पारायण सोहळा इतिहास प्रथमच झाला. यासाठी काश्मीर ते कन्याकृमारी पर्यंतचे भावीकांची उपस्थिती होते. अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. अशा विराट कार्यक्रमातुन अनेक अध्यात्मिक , सामाजिक व राष्ट्रीय विषयावर प्रबोधन झाली.
 • २४) सर्व समावेशक व्यक्तिमत्व राज्यातील माननीय लोकनेते मंत्री, केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब, तसेच, लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब, लोकनेते सुशील कुमार शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाणा साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब, बबनरावजी पाचपुते साहेब, बबनराव लोणीकर साहेब अशा अनेक मान्यवरांचे घनिष्ट संबंध, साहित्यीक, उद्योजक वरीष्ठ अधिकारी, संत महंत विविध क्षेत्राशी समन्वयातुन विचार व भाषणामध्ये सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारी वाणी असल्यामुळे, आणि विनम्र, निगर्वी व र्निलोभवृत्ती असल्यामुळे सर्वांचे आवडते व चाहते.
 • २५) थोर परंपरेचा वारसाः श्री विठ्ठल मंदीर डिकसळ तीर्थक्षेत्र बदजी प्राप्त करुन व श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिकसळ पर्यटाचा दर्जाप्राप्त करुन घेऊन विकासाची वाटचाल पारंपारीक सर्व कार्यक्रम उत्तम पद्धतीने चालु. जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांचे समकालीन श्री सत शिवाजी बोधले महाराज व श्री संत मानकोजी बोधले महाराजांचे कुळातील नववे वंशज श्री गुरु रामचंद्र बोधले महाराजांचे पुतने ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज यांनी आपल्या परंपरेचा वारसा समर्थ पणे सांभाळून श्रीगुरु रामचंद्र बोधले महाराजांची सेवा व त्यांचे कडुन अध्ययन, पद्मश्री शंकर बापु आपेगावकरांचे निश्रीम प्रेम व आर्शीवाद तथा मार्गदर्शन, स्वानंद सुख चार वर्ष अध्ययन व गुरुजनांची कृपा व गुरुबंधुंचा जिव्हाळा, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे ------जोग महाराजांचे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये माध्यमातुन देशभरात वारकरी सांप्रदायाचे संघटनात्मक कार्य व जगभरात वारकरी सांप्रदायाचे संघटनात्मक कार्य करण्याचे नियोजनात्मक यशस्वी वाटचाल. मातृ-पितृ भक्तिचा मनोमन आद जिव्हाळा व सेवा आणि प्रबोधन अध्यात्मीक कार्याला सामाजीक, वैज्ञानीक व अधुनीकतेची जोड देऊन कार्य करण्याची पद्धती.
 • अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून घेतले जाणारे विविध उपक्रम पुढील प्रमाणे.
 • १)केंद्रीय व राज्यस्तरीय केंद्रशाशीत स्तरावर अधिवेशन आयोजित करणे.
 • २) विभाग, जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर वारकऱ्यांचे मेळावे घेऊन, अध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व राष्ट्रीय सेवात्मक प्रश्नांवर वरिष्टाचे सूचने प्रमाणे विचार मंथन करणे.
 • ३) भारतीय संस्कृती व संत विचाराचे प्रचार व प्रसारासाठी वारकरी सांप्रदायिक विशाल आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे अथवा विशाल स्वरूपाचे अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करणे.
 • अ) जगतगुरू संत तुकाराम महाराज जन्म चर्तुः शताब्दी सोहळ्या निमित्त आंतरराष्ट्रीय विराट गाण्या पारायण सोहळा २१ डिसेंबर २००८ ते २८ डिसेंबर २००८ श्री क्षेत्र देहू, ता. खेड, जि. पुणे येथे आयोजन केले.
 • ब) २७ डिसेंबर २०१५ ते ३ जानेवारी २०१६ श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्म शतकोत्तर रौप्य महत्सवी वर्षा निमित्त आंतरराष्ट्रीय विराट ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र आळंदी, ता. हवेली, जि. पुणे येथे आयोजन केले.
 • ड) दिल्ली येथील रामलीला मैदानावर आंतरराष्ट्रीय विराट ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ११ मार्च २०१८ ते १८ मार्च २०१८ आयोजन केले.
 • ४) स्वछता व विविध सामूहिक उपक्रम.
 • ५)पाणंद मुक्ती कार्यक्रम तथा हागणदारी मुक्ती
 • ६) आरोग्य विषयक
 • अ) सर्व रोग निदान शिबिर घेणे
 • ब) आरोग्य विषयक विविध उपक्रम घेणे
 • ड) व्याशन मुक्ती विषयक कार्यक्रम
 • ७) अंधश्रद्धा निर्मुलन
 • ८) पर्यावरण संतुलन
 • ९) वृक्षारोपण विषयक
 • १०) पुरस्कार देणे व सत्कार करणे
 • ११) राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृती व संत विचार परंपरेवर अधिक विशेष कार्य करण्यात व्यक्ती अथवा संस्थान मर्यादित संख्येनी पुरस्कार अथवा सत्कार करणे
 • १२) केंद्रीय स्तरावर राज्य स्तरावर मर्यादित संख्या ठेऊन पुरस्कार देणे अथवा सत्कार करणे
 • १३) विभागीय व जिल्हा स्तरावर मर्यादित संख्या ठेऊन पुरस्कार देणे अथवा सत्कार करणे.
 • १४) तालुका व ग्राम स्तरावर पुरस्कार देणे अथवा सत्कार करणे.
 • १५) अखिल भारतीय वारकरी मंडळ संचालित श्री. विठ्ठल प्रासादिक श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज ज्ञान पिठाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व संत विचार परंमपरेच्या प्रचार व प्रसारासाठी अध्ययन व अध्यापनाचे कार्य करणे व भारतीय संस्कृती व संत विचार परंमपरेचे सामजिक वैज्ञानिक अशा विविध पैलूंनी संशोधनात्म कार्य करणे, अध्ययन करणे व अध्यापन करून संपूर्ण भारत व विश्व भरात त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील राहणे.
 • १६) अनाथ व निराधार मुलांसाठी वसतिगृह चालविणे.
 • १७) अध्यात्माचे शिक्षण व संस्कार देण्यासाठी वारकरी शिक्षण संस्था चालवणे.
 • १८) ५ वी ते १० वी इयत्ता माध्यमिक शिक्षण देण्यासाठी निवास वसतिगृह चालवणे.
 • १९) महिला विकासाच्या विविध योजनेची माहिती देणे प्रबोधन करणे.
 • २०) लहान मुलांसाठी कुपोषण मुक्तीच्या कार्यशाळा घेणे व त्याप्रकरचे प्रबोधन करणे.
 • २१) अखिल भारतीय मंडळाच्या ज्ञानपीठाच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रशिक्षण व वर्ग सुरू करून त्यांना उद्योग व व्यावसाय अथवा कुशल कामगार म्हणून प्रशिक्षण देणे.
 • २२) विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, कुपोषण, महिला सक्षमकरण, बेटी बचाव, वृक्षारोपण, पर्यावरण संतुलन इत्यादी. सामजिक मुद्द्यावर उत्तम पद्धतीने प्रबोधन करून समाजाला जीवनाची अध्यात्मिक उद्दिष्टाने वैज्ञनिक, सामजिक व औद्योगिक इत्यादी मुख्य प्रवाहामध्ये आणणे.
 • श्रीगुरु प्रसन्न
 • अखिल भारतीय वाकरी मंडळ संचलित श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज ज्ञानपीठ
अधिक माहितीसाठी